माणसं खरंच विसरता येतात का?


पाहिल्या ब्लॉग मद्ये आपण पाहिलं की, नेमकी सुरुवात झाली कोठून? त्या मद्ये एक ओळ अशी होती की, पाहिल्या आनोळखी भेटीत घडलेलं काहितरी खास. ज्याने लिहायला प्रेरणा दिली. तर ती नेमकी कोण होती? आणि तो प्रवास कसा होता हेच आपण पाहणार आहोत.

तिने विचारलं की, गोष्टी माणसं विसरता येतात का? त्यावर मी माझं मत मांडलं आहे, एका किस्स्यासंग.

मी नेहमी वाट पाहायचो तिच्या बोलण्याची. तिचा मेसेज येताच, मी आतून जाम खुश व्हायचो. पण मी कधीच दाखवत नसे. एक विचित्र द्वंद्व मनात चालायचं. कधीकधी मला वाटायचं, "आपण खरंच विसरू शकतो का काही गोष्टी?"

कधी काळी, तिच्यासोबतच्या गप्पांमध्ये, मी माझ्या मनातलं सारं सांगितलं होतं, अगदी निरागसतेनं. पण तिचं उत्तर साधं आणि शांत असायचं, जसं की तिला यामध्ये रसच नसेल. त्या साधेपणामागे खूप काही दडलेलं असावं, असं मला नेहमी वाटायचं. आणि मग हळूहळू, माझ्या त्या भावनांचाच अंत झाला.

गोष्टी विसरणं खूप सोपं वाटतं, पण त्यामागे अनेक भावनांना मारावं लागतं. त्या भावना संपवताना आपण आतून तुटतो, दुखतो, पण एकदा का त्या संपल्या की विसरणं सोपं होतं. असं वाटतं, "हो, झालं! आता मी विसरलो." पण खरंच का?

खरं सांगायचं तर, माणसं कधीच विसरता येत नाहीत. त्या आठवणी फक्त मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसतात. त्या तिथे शांत असतात, जणू कपाटातल्या एखाद्या फाईलसारख्या. आपण त्या कपाटाचा दरवाजा उघडायचा नाही, असा ठाम निश्चय करून बसतो. पण काही वेळा नकळत तो दरवाजा उघडतो, आणि त्या आठवणींचं ओझं पुन्हा आपल्याला खुणावतं.

माझ्यासोबतही असंच झालं. एकदा गंमत म्हणून, जुन्या गोष्टी तिच्यासमोर उघडल्या. सहज विचारलं, "तुझं उत्तर सांगशील का?" तेव्हा त्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर आल्या. मी स्वतःला फसवलं होतं, कारण मी त्या विसरल्या नव्हत्या, फक्त दूर ठेवल्या होत्या.

माणसं खरंच विसरता येतात का?
माणसं कधीच विसरत नाहीत. फक्त आपण त्या दूर ठेवतो, आठवणींच्या कपाटात. पण त्या तिथेच असतात. आपल्याला वाटतं, आपण त्यांचं अस्तित्व मिटवलंय. पण खरं तर आपण त्या आपल्याच आत कुठेतरी दडवून ठेवल्या असतात.

अशा वेळी, त्या आठवणी स्वीकारणं महत्त्वाचं असतं. त्या आपल्या आयुष्याचा भाग आहेत, त्या नाकारून चालणार नाही. त्या आठवणींना एक जागा द्या, त्यांना सांभाळा, पण त्यांचं ओझं बनू देऊ नका.

शेवटी, माणसांना विसरणं म्हणजे त्यांना गमावणं नाही, तर त्यांच्या आठवणींना योग्य ठिकाणी ठेवणं असतं.

चला तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत सर्वांना नमस्ते!