सुरुवात!
भावनांचा सूर हरवतो क्षणात.
तिथेच, शांततेच्या ओढीतून नवा सूर,
मनाच्या गाभाऱ्यात जन्म घेतो.
संपल्यासारखे वाटतात जिथे नाते,
विश्वासाचे धागे तुटतात सोबत.
तिथेच, धाग्यांना जोडणारा एक हात,
नव्या विश्वासाने पुढे येतो.
संपल्यासारखे वाटते जिथे आयुष्य,
प्रत्येक दिशा अडचणीने भरलेली.
तिथेच, संघर्षातून उगवतो मार्ग,
आणि जगण्याला मिळते नवी कहाणी.
संपल्यासारखे वाटते जिथे आशेचे किरण,
आकाशही भंगलेल्या स्वप्नांचे असते.
तिथेच, काळोखालाही पार करणारे,
नव्या प्रकाशाचे दीप जागते.
संपल्यासारखे वाटते जिथे सर्व,
खरं तर तिथेच जगणं सुरू होतं.
अंधारानंतर उगवतो सूर्य,
आणि आयुष्यही पुन्हा फुलतं.
संपल्यासारखे वाटते जिथे सर्व,
तिथेच नव्या सुरुवातीची चाहूल असते.
कारण अंताच्या खुणा सांगतात नेहमी,
की जीवनात पुन्हा एकदा सुरुवात असते.
-अनविचारी शब्द (Words by Nisarg)