उखाण्यात तुझं नाव कधी घेत नाही...
मनाच्या कागदावर रंग भरतो.
लिहितो कधी चंद्र, कधी सावली,
तुझी आठवण कधी शब्दांत पेरतो,
पण उखाण्यात तुझं नाव कधी घेत नाही,
कारण ते मनातच फुलवलंय हल्ली.
शब्द मांडत बसलो होतो,
तितक्यातच उखाणं घ्यायला साऱ्या लोकांनी हाक मारली.
पण नाव तुझं तिथं ओठांवर आलं नाही.
कागदावर लिहिलंय हजार वेळा,
शेर-कविता-गझलांत तुझं अस्तित्व मांडून ठेवलंय हल्ली.
"कवी असलास तरी नाव घ्यायला हवं," असं म्हणत
सायऱ्यांनी माझ्यावर नजर टाकली.
कधी तुला चंद्र म्हणलो, कधी सावली म्हणलो,
तर कधी शायरीच्या ओळींमध्ये तुझी आठवण लपवली.
उखाण्यात घेतलं दुसरं नाव,
पण मनात मात्र तुझंच नाव पेरून ठेवलंय हल्ली.
शेवटी अजून आग्रह केला, जवळच्याच मंडळींनी,
"घे अजून एक शेवटचा उखाणा, लाजू नकोस!"
मी हसलो... आणि हळूच बोललो,
"तिचं नाव माझ्या हृदयातच आहे, ते जपून ठेवलंय."
तिथं शब्दांमध्ये बांधता आलं नसतं, तर
स्वतःचीच (कवी म्हणून) ओळखं हरवून
रिकामाच बसलो असतो मी हल्ली..."