म्हणून मी जिवंत आहे...
आजही जगतो मी,
म्हणून मी जिवंत आहे...
माझ्यासाठी मी कधीच संपलो,
विसरलो असतो कधीच तुलाही,
पण आठवणी विसरणं एवढं सोपं नसतं...
तू नसतानाही तुझ्यासाठी जगणं,
हेच माझं प्रेम होतं
म्हणून मी जिवंत आहे...
आजही लिहितो तुझ्याच साठी,
प्रत्येक कवितेत तुलाच मांडतो...
ऐकशील, वाचशील, पाहशील
माझी एखादी कविता,
आणि मैफिलीत तूही येशील कधीतरी,
म्हणून मी जिवंत आहे...
रस्ते बदलले, दिशा हरवल्या,
आठवणी मात्र तिथेच थांबल्या.
मी तुला विसरणार नाही,
हे कदाचित तुलाही ठाऊक आहे.
तू वळून पाहशील का?
हा प्रश्न अजूनही तसाच आहे,
म्हणून मी जिवंत आहे...
मैफिलीमध्ये
बरसतील टाळ्या नेक विषयांवर,
तुझ्या कानांपर्यंत पोहोचतील का,
ठाऊक नाही.
पण जेव्हा एखादा शेर तुला भिजवून जाईल,
तेव्हा तुझ्या पापण्यांवर साठलेले अश्रू
माझ्या अस्तित्वाचं उत्तर देतील,
म्हणून मी जिवंत आहे...
टाळ्यांचा आवाज दाटून येईल,
पण मी शांत बसेन,
कोणी विचारेल, ‘का गप्प?’
पण मी ते हसून टाळीन.
फक्त एकदा तुला समोर पाहायचं आहे,
तेव्हा सांगेन, ‘आज मी खरंच जिवंत आहे…’
म्हणून मी जिवंत आहे..."