वाट्याच प्रेम...
ज्याला त्याला वेळेनुसार मिळत असतं.
कोणाला लवकर, कोणाला उशिरा,
कोणाला सहज, तर कोणाला कठीण वाटत असतं.
कोणी पहिल्याच नजरेत हरवतो,
कोणी वर्षानुवर्षं वाट पाहत असतो.
कोणी क्षणात जिंकत असतं,
कोणी जन्मभर हरवत असतं.
कोणी प्रेमाला भाग्य मानतं,
कोणी नशिबाला दोष देतं.
कोणाच्या ओठांवर हसू उमलतं,
कोणाच्या डोळ्यांत आसवं दाटत असतं.
कधी जवळ असूनही दुरावा वाटतो,
कधी अंतर असूनही मन जुळत असतं.
कधी नजरेतून मनात उतरतं,
कधी हृदयातून ओघळून जातं.
कधी शब्दांत सांगता येतं,
कधी मौनात अडकून राहतं.
कधी जवळ असूनही हक्क नसतो,
कधी दूर असूनही मनाचा धागा जुळतो.
प्रेमाला ना नियम नसतात,
ना त्याला अट नसते.
प्रेमाची वेळ ठरलेली नसते,
ना त्याला नशिबाची गरज असते.
कोणी मनात राहतं, पण हातात येत नाही,
कोणी हक्काचं असूनही आपलंच राहत नाही.
प्रेम फुलावं लागतं, ते टिकवावं लागतं,
नाहीतर ते हवेत विरून जातं.
प्रेम कधीच शब्दात सांगत नाही,
ते स्पर्शात, नजरेत, हळवेपणात असतं.
कोणी ते सहज ओळखतं,
तर कोणाला ते गमावल्यानंतर समजतं.
प्रेम म्हणजे नशिबाचं एक कोडं,
सगळ्यांनाच त्याचं उत्तर मिळत नसतं.
बरोबर जुळलं तर सुखात नांदत असतं.
नाहीतर आठवणींच्या सावलीत,
मन हळूहळू मन रमवत असतं.
शेवटी,
प्रेम मिळालं तर आठवणींत राहतच,
आणि मिळालं नाहीच तरी त्याची जागा कधीच भरत नाही.
प्रेम प्रत्येकाच्या वाट्याला येतं,
फक्त काहींना आयुष्यभर साथ देतं,
तर काहींना फक्त हसऱ्या आठवणीत ठेवतं..."