"पहिलं प्रेम: एक हळवं पाऊल..."

या सिरीजमध्ये पहिल्या प्रेमाचा प्रवास मांडणार आहे—त्या पहिल्या नजरेपासून ते शेवटच्या आठवणींपर्यंत, त्याच्या गोडसर क्षणांपासून ते हळव्या वेदनांपर्यंत.


विरहाच्या कविता लिहिता लिहिता पहिल्या प्रेमाच्या आठवणींना पुन्हा जाग आली आणि तिथूनच या ब्लॉग सिरीजचा विषय मिळाला. प्रेम ही भावना जितकी गोड, तितकीच गुंतागुंतीची, आणि त्यातलं पहिलं प्रेम तर कायम मनाच्या कप्प्यात राहणारं असतं. त्याची निरागसता, उत्कटता आणि प्रामाणिकता आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. कधी ते मनात खोलवर रुजतं, कधी नकळत हरवतं, पण त्याच्या आठवणी मात्र कायम मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या राहतात.

चला तर, भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार!