राख...
पण ती दूरावली होती,
धरणीवर उभं राहायचं होतं,
पण तिची सावलीही सोडून गेली होती.
तिने गुंतवले होते शब्दांमध्ये,
आणि शब्दच माझे हरवले होते,
शपथांच्या राखेत शोधताना तिला,
स्वप्नही माझे निखळून गेले होते.
वेदनांची धग तीव्र होती,
तरीही उरात लपवले होते,
स्पर्श नसताना देखील तिने,
अस्थी जखमीत जपले होते.
राखेत सापडले अस्तित्व जेव्हा,
तेव्हा वेदनाही सोसत नव्हती,
जिथे तिने हात सोडला होता,
आजही पावलं तिथेच थांबत होती…
हरवलेल्या वाटांवर चालताना,
तिच्या सावल्याही चुकत होत्या,
मी जिथे तिला शोधायचं ठरवलं,
तिथे आठवणींची *राख* उरली होती…
संध्यासोबत मावळलो मी,
रात्र झाली तरी उजळतो आहे,
ती नसतानाही उरात कुठेतरी,
तिचाच श्वास ऐकू येतो आहे…"