वाटसरू...
नदीसारखा वाहत होतो काठावरून.
वाटलं, कुणीतरी
बांध घालेल या प्रवाहावर,
शांत होऊन थांबता येईल,
एका किनाऱ्यावर घर बांधता येईल.
वाटलं, कदाचित माझं नशीब कुणाच्या हातात असेल,
हातात हात घेत कोणी सोबत चालेल,
एका छताखाली सावली देईल,
कधी सुखात, कधी दुःखात सोबत राहील.
पण कोणी वाटसरू अजून भेटलाच नाही,
जो भेटला, तो मनापर्यंत पोहोचला नाही.
कोणी क्षणभर थांबला,
कोणी हात सोडून निघून गेला.
...शेवट शोधता शोधता माझं मन मात्र हरवत होतं.
कुणासाठी आस लागली, पण त्यांना फरकच नव्हता,
कुणाशी शब्द जुळले, पण भावना नाही.
प्रत्येक वाटसरू आला-गेला, पण कोणीच थांबलं नाही,
माझ्यासाठी, माझ्या मनाचा अजून कोणीच झाला नाही.
म्हणून आता तरी,
वाटसरू न होता, सोबती होशील का?
क्षणभर नव्हे, अखेरपर्यंत,
हातात हात घेऊन चालशील का?
मी शब्द, तू अर्थ होशील का?
मी कागद, तू शाई होशील का?
ही कविता अपूर्ण राहू नये म्हणून,
तू शेवटची ओळ होशील का?
सांग तू माझी होशील का?"