तिळ...
गर्दीच्या मधोमध,
गर्दीचाच एक भाग होऊन,
वाट काढत पुढे जात होतो.
ती गर्दीत होती,
पण तरीही वेगळी भासली,
केस मागे घेताना
ओळखीचा वारा आला,
आणि मनात एक जखम उमटून गेली.
तेवढ्यात नजर गेली,
त्या गालावरच्या लहानशा ठिपक्याकडे,
तो एक काळा तिळ,
तिला आणखी सुंदर करत होता,
की माझ्या काळजात भेद पाडतोय,
हेच समजत नव्हतं.
शब्दांची गरजच नव्हती,
त्या एका क्षणातच
मी हरवून गेलो,
आणि नकळत माझ्या कवितेत
ती विरघळून गेली.
रस्ता ओलांडताना
तिने मागे वळून पाहिलं,
का कुणास ठाऊक,
पण त्या नजरेतही तिच्याइतकाच
मी ही गुंतत गेलो,
जस काही जन्मभराचा मोह आहे,
एका क्षणापुरता.
आणि मग पुन्हा,
गर्दीत ती नकळत विरघळली,
मी तिथेच थबकलो,
त्या एका आठवणीच्या सावलीत...
पहिला एक तिळ मी
आणि घायाळ झालो..."