ती दिसली... आणि हरवलीही...
आणि काळ जणू थांबल्यासारखा वाटला,
श्वासही क्षणभर विसरला,
अन् अंतराने सगळं बदलल्यासारखं जाणवलं.
डोळ्यांना विचारलं, पण उत्तर नव्हतं कुठेच.
ती दिसली…
आणि जुन्या आठवणींचा गुंता उसवला,
ओठांवर असंख्य शब्द होते,
पण त्या क्षणाने गप्प राहणंच पसंत केलं.
ती दिसली…
मनात दडलेल्या आठवणी जाग्या झाल्या,
श्वासात विसरलेले क्षण पुन्हा जुळले.
का कुणास ठाऊक, पण
बोलणं होण्याआधीच ती नजरेआड झाली.
ती दिसली…
एक क्षणभर हसलीही,
माझ्या मनात एक झुळूक उमललीही.
भेट ही अपूर्ण होती, तरीही संपूर्ण भासली,
का कुणास ठाऊक, पण ती पुन्हा हरवली…
कदाचित न भेटण्यासाठी..."